Ramdas kadam.jpg
Ramdas kadam.jpg 
मुंबई

कोकणाच्या प्रश्नांवरून रामदास कदम यांची फटकेबाजी

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः कोकणाला सिंचनात निधी मिळावा, या परिसराला पाणी मिळावी, अशा मागणीसाठी आमदार रामदास कदम यांनी आज विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार फटकेबाजी केली. 

ते म्हणाले, की कोकणाला न्याय कधी देणार, मी पाच वर्षाच्या आधी तत्कालीन राज्यपालांना भेटलो होते. त्या वेळी त्यांनी त्या शासनाला पत्र दिले होते. कोकणाला निधी उपलब्ध करून द्यावा. आताही राज्यपालांना भेटलो. सिंचनाचे विभागनिय अधिकार राज्यपालांना द्यावे. जिसके हात मे लाठी, उसके हात मे भैंस एकले होते, हे आता अनुभवतो आहे. माझ्या कोकणाला न्याय मिळावा. पश्चिम महाराष्ट्राला सर्व पैसा देणार आहात का, डोंगराच्यावर विकास आणि डोंगराच्या खाली भकास, असे करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याबबत सातत्याने मागणी करतो आहे. नागपूरचा, विदर्भाचे सिंचन मंडळ मिळते, कोकणाने काय केले. कोकणासाठी महामंडळाची स्थापना व्हावेत. कोयनेचे समुद्राला मिळणारे पाणी रायगड, कोकणाला मिळावे. पाण्याचे गुपचूप नियोजन कशासाठी करता. आमची तहाण आधी भागवा, असे ते म्हणाले.

पशुसंवर्धन खात्याबाबत बोलताना ते म्हणाले, की माणसांना न्याय देता येत नाही, तर जनावरांना तरी न्याय द्या. मच्छिमारांची अवस्था वाईट झाली असून, त्यांच्यासाठी निधी द्यावा. त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांचे प्रश्न मांडले

खेडची पोलिस वसाहत शंभर वर्षांपूर्वीची आहे. ती सर्व गळते आहे. या कासासाठी 15 कोटी मागतो आहे. तीनदा निवेदने दिले, पण तुम्ही दमडाही दिला नाही. एका बाजुला पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा करतो, दुसऱ्या बाजुने त्यांना सुविधा देत नाहीत. पोलिस व त्यांच्या वसाहतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कोकणासाठी स्वतंत्र महामंडळ हवे ः दरेकर

पुरवणी मागणीत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकणाच्या प्रश्नांचा उहापोह केला. पर्यटन, मासेमारी, रस्ते याबाबत त्यांनी मागण्या केल्या. कोकणसाठी उर्वरीत वैधानिक विकास महामंडळ स्थापना करावी, अशी मागणी त्यांनी केली.इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन यापूर्वी केला होता. केवळ कागदावर आराखडे होणार असतील, तर त्याला आम्ही फसणार नाही. कोकणच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम करू नये. पर्यटनाच्या दृष्टीने आख्खा कोकण जोडण्याची गरज आहे. आदिवासी पट्टयात पर्यटन वाढते. गड, किल्ले, जागृत देवस्थाने, रस्तागिरीचे पर्यट आहे. परंतु कोकणासाठी कधीही पर्यटन विकास म्हणून निधी दिला. 5 हजार कोटींचे पॅकेज केले, तरच कोकणाचा विकास होऊ शकतो. त्यासाठी एक कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT