Ramdev Baba  Sarkarnama
मुंबई

Ramdev Baba : महिला साडीत छान वाटतात, काही घातलं नाही तरी छान वाटतात : हे काय बोलून गेले बाबा..

Ramdev Baba : यावेळी मंचावर त्यांच्यासोबत अमृता फडणवीसही उपस्थित होत्या

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : एकीकडे राजकीय वर्तुळात वादग्रस्त विधानांची मालिका सुरू असताना, योगगुरू रामदेव बाबा यांनीही एक वादग्रस्त विधान केले आहे. रामदेव बाबा म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात. " आता या विधानामुळे पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता चिन्हे दिसत आहेत.

रामदेव बाबांनी हे वादग्रस्त विधान केले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाण्यात एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हा कार्यक्रम महिलांसांठी आयोजित करण्यात आला होता. महिलांसाठी योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात सकाळी योग शिबिर झाले, कार्यक्रमासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र त्वरित महिलांसाठी महासंमेलन सुरू झाले. यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी वक्तव्य करत केले की,

महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर त्या काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT