Rapper Ram Mungase Bail inform Ambadas Danve : Sarkarnama
मुंबई

Rapper Ram Mungase Bail : 'गुवाहाटीचे चोर आले, 50 खोके घेऊन..' रॅपर राज मुंगासेला जामीन मंजूर : दानवेंची माहिती

Rapper Ram Mungase Bail inform Ambadas Danve : गुन्हा दाखल झाल्यापासून राम मुंगासे बेपत्ता

सरकारनामा ब्यूरो

Rapper Ram Mungase Bail inform Ambadas Danve : शिवसेना पक्षातल्या अभूतपुर्व फुटीनंतर '५० खोके' ही घोषणा विरोधकांकडून दिली जात होती. सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी ५० खोके ही घोषणा देण्यात येत होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) मराठी रॅप साँग कलाकार राज मुंगसे याने 'चोर आले पन्नास खोके घेऊन', असा रॅप गाणं त्यानं सादर केलं होतं. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर धूमाकूळ घालत होता. या गाण्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याला जामीन मिळाल्याची माहिती मिळत आहे.

मुंगासे यांच्या या गाण्यामध्ये अश्लील शब्दाचा वापर करण्यात आला आहे, असा ठपका ठेवून शिंदे गटाचे पदाधिकारी स्नेहल कांबळे यांनी रॅपर राज मुंगासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून मुंगासे बेपत्ता झाले होते. त्यामुळे यावर वेगवेगळ्या चर्चा घडून येत होत्या. मात्र आता राज मुंगासेंना अटकपूर्न जामीन मंजूर झाले आहे, अशी माहिती विधानपरिषेदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.

अंबादास दानवेंची फेसबुक पोस्ट -

याप्रकरणी अंबादास दानवे यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये ते म्हणतात, मराठी रॅप कलाकार राज मुंगासे याने "चोर आले 50 खोके घेऊन" गाण्याची निर्मिती केली. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी या गाण्यामुळे त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र वकील शुभम कोहिते यांच्यावतीने मुंगासे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज ठेवला . मंगळवारी (११ एप्रिल) रोजी कल्याणचा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला गेला. न्यायालयाने रॅपर राज मुंगसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला गेला.

महाराष्ट्र राज्यात सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे गुन्हा झाला आहे. युवकांवर, कलाकारांना गुन्हा दाखल होऊन तरुणांचे भविष्य हे सरकार उद्ध्वस्त करत आहे, आम्ही यांच्या पाठीशी सर्व ताककदीनिशी उभे असू." असे अंबादास दानवे म्हणाले.

शिवसेनेच्या (शिंदे गट) युवासेनमधील कार्यरत एका सदस्याने या रॅप साँगबाबत आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंगासे या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे रॅप साँग तयार करणारा युलक मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT