Rashmi Shukla, Mahavikas Aghadi Sarkarnama
मुंबई

Rashmi Shukla : सरकार स्थापनेआधीच फडणवीसांच्या गृह विभागाचा 'मविआ'ला मोठा झटका; शुक्ला पुन्हा पोलिस महासंंचालकपदी

Mahayuti Government : महायुती सरकारकडून पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला मंगळवारी (ता.26)आपला पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पदमुक्त करण्यात आलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.त्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्याबाबत मोठा निर्णय घेतानाच त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवले होते.विधानसभा निव़डणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुती सरकारनं सत्तेत येण्याआधीच मोठा निर्णय घेतला आहे.

महायुती सरकारकडून पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला मंगळवारी (ता.26)आपला पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पदमुक्त करण्यात आलं होतं. आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.

महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तत्काळ रविवारी(ता.24) रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.त्यानंतर काही तासांतच शुक्लांना पुन्हा पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती.पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.

गृहविभागाच्या अध्यादेशात काय म्हटलंय?

गृहविभागाकडून मंगळवारी काढण्यात आलेल्या जीआरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता कालावधी संपला असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

आता निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानं आणि आचारसंहिता समाप्त झाली असल्यानं रश्मी शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.तसेच त्यांनी संजय कुमार वर्मा यांच्याकडून राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारावा असा आदेश गृहविभागाकडून देण्यात आले आहेत.

राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.

रश्मी शुक्ला पदावर असल्याचे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. यापार्श्वभूमीवर शुक्ला यांची करण्यात आलेली बदली महत्वाची मानली जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आणि सत्ता स्थापना कालावधीत शुक्ला यांनी आपले फोन टॅपिंग केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT