Raj Thackeray on Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Interview : रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर अजित पवार ? ; "...काकांकडेपण लक्ष द्या.."

Raj Thackeray on Ajit Pawar : एका वाक्यात बोलता नाही येणार नाही.

सरकारनामा ब्युरो

Raj Thackeray on Ajit Pawar : महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सध्या फार गुंतागुंतीची झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षाविरोधात बंड पुकारून भाजपासोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (बुधवारी) भाष्य केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार आणि राज्यात राजकीय भूंकप होणार अशा चर्चा सुरू होत्या. यावर अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगितले आहे.

या संदर्भात राज ठाकरे यांना एका कार्यक्रमात अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना राज्यातील विविध नेत्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या विषयी विचारले. या प्रश्नाला राज ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तरे दिली.

अजित पवार यांना काय सल्ला द्याल या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "अजित पवार यांच्याबाबत रत्नागिरीच्या सभेत मी सविस्तर बोलणार आहे," राज ठाकरेंनी दिलेल्या या सांकेतिक उत्तरामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांच्याबाबत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता लागली आहे. रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर अजित पवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाच तारखेला सविस्तर बोलणार..

"खरं तर मला पाच तारखेच्या रत्नागिरीच्या सभेमध्ये त्यांच्याबद्दल सविस्तर बोलायचे आहे. मला एका वाक्यात बोलता नाही येणार नाही, पण तरीही त्यांना सल्ला देईल की, बाहेर जेवढे लक्ष देत आहात तेवढं काकांकडेपण लक्ष द्या," असे राज ठाकरे म्हणाले

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT