Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency 2024: sarkarnama
मुंबई

Raut Vs Rane: विनायक राऊतांचे महायुतीच्या उमेदवाराला कडवे आव्हान; रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेत....

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency 2024: मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होईल, असे सध्याचे चित्र आहे. राणे यांचे नाव अजूनही निश्चित झाले नसले तरी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास राणेंना आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg Political News : कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency 2024) ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पण महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जाते. त्यामुळे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.

राणे मतदारसंघातील अनेकांच्या भेटी-गाठी घेत आहेत. राणे यांच्यासोबत राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही इच्छुक आहेत. मात्र, त्यांनी राणेंसाठी माघार घेतल्याचे समजते. राणेंना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा सामना राऊत होईल , त्यामुळे या मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होईल, असे सध्याचे चित्र आहे. राणे यांचे नाव अजूनही निश्चित झाले नसली तरी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास राणेंना आहे.

राणेप्रमाणेच विनायक राऊतांची प्रचार सुरू केला आहे. त्यांची प्रचाराची पहिली फेरी अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी आतापर्यंत बैठकांवर भर दिला. नारायण राणे हेच उमेदवार गृहीत धरून ते टीका करीत आहेत. गावागावांत जाऊन त्यांनी लोकांसमोर त्यांची भूमिका मांडली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई यांसह अनेक मुद्दे प्रचारात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

तालुकानिहाय महत्त्वाच्या कार्यकर्त्याच्या सभा घेण्यास राणे यांनी सुरुवात केली आहे. राणे यांनी आतापर्यंत पाच ते सहा तालुक्यांमध्ये सभा घेतल्या आहेत. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही जिल्ह्याच्या काही भागांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल त्याला मतदान करा, असे दोघांकडून केले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधाऱ्यांवर कोणताही विकास केला नसल्याचा आरोप केला जात आहे, तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राऊत हे विकास प्रकल्पांना हेतुपुरस्सर विरोध करीत असल्याची टीका सत्ताधारी करीत आहेत.

आतापर्यंत पाच ते सहा तालुक्यांमध्ये नारायण राणे यांनी सभा घेतल्या आहेत. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही जिल्ह्याच्या काही भागांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल त्याला मतदान करा, असे दोघांकडून केले जात आहेत.

२०१९ मध्ये रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत आणि नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राणेंचा पराभव झाला होता.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT