मुंबई : 'भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करुन स्वत: नामनिराळे राहतात, पण या भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे उघडे पाडणार,' असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट इशाराच दिला आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. संजय राऊत आज पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत, यावेळी ते भाजपाच्या नेमक्या कोणत्या नेत्यांबाबत गौप्यस्फोट करणार आहेत, याकडेच सर्वांच लक्ष लागलं आहे. (Sanjay raut latest political news update)
संजय राऊत यांनी ईडीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार राऊत यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं ट्विटद्वारे सांगितले होते. "केंद्रीय तपास यंत्रणा कश्या प्रकारे घोटाळा करत आहेत हे सर्वांसमोर आज उघड करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी १३ पानी पुराव्यासह पत्र लिहिलं आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या भ्रष्टाचारी कारभाराबाबतचं हे पत्र आहे. पत्रकारांच्या आग्रहामुळे ते पत्र देखील आज सर्वांसमोर आणणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.
त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणांनाही किती भ्रष्टाचाराने पोखरले आहे, कोण कोणाच्या नियंत्रणाखाली ते काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करून अडचणीत आणून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला हातभार लावला जात आहे, हे सर्व टप्प्याटप्प्याने बाहेर येईल, आज त्यातला पहिला भाग आहे तो बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यापुर्वी संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. एवढंच नाहीतर, लवकरच या पिता-पुत्रांना तुरुंगाची वारी करावी लागणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी अनेकदा केला. त्यामुळं आज ते कोणत्या नेत्यावर बॉम्ब फोडणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.