Ravikant Tupkar
Ravikant Tupkar sarkarnama
मुंबई

Ravikant Tupkar : हिंमत असेल तर अडवाच, जलसमाधी घेणारच : एक हजार शेतकऱ्यांना घेऊन तुपकर मुंबईकडे रवाना

सरकारनामा ब्यूरो

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होणार नाहीत. तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणात नाही. आज जलसमाधी घेणार असल्याचा पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर यांनी (Ravikant Tupkar) आपला इरादा स्पष्ट केला आहे. आज जलसमाधी आंदोलन करण्यासाठी जवळपास एक हजार शेतकऱ्यांचा जमाव घेऊन तुपकर मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

आमच्या जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच राज्य सरकारनं घाईघाईने बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी 157 कोटी रुपयांची निधी जाहीर केला. पण हा निधा शेतकऱ्यांशी पुरेसं ठरणार का? असा प्रश्न तुपकरांनी उपस्थित केला. 157 कोटींची अत्यल्प मदत जाहीर करून सरकार आमची थट्टा करू शकत नाही.

आमचं आंदोलन एका जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी नाही, तर संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना खरोखर मदतच द्यायची असेल तर, ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, जलसमाधी घेणारचं, असे तुपकर म्हणाले.

काय आहेत मागण्या?

सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुपकर आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा भाव क्विंटलला 8 हजार 500 रुपये, कापूस भाव क्विंटलला 12 हजार 500 रुपये, राहावा याबाबत सरकारने निश्चित एक ठाम भूमिका घ्यावी. सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. बाहेरून येणाऱ्या खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावावा. ओला दुष्काळ जाहीर केला जावा.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्ायत यावी. पीक कर्ज माफ केले जावेत. शेतकऱ्यांना फक्त रात्रीची नाही तर दिवसाही वीज मिळावी. शेतकऱ्यांना, पीकांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान, त्यामुळे वनविभागाला लगत असलेल्या शेतांना कंपाऊंड लावून देण्यात यावे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT