Eknath Shinde Ravindra Chavan  sarkarnama
मुंबई

Mahayuti Politics : एकनाथ शिंदे ठाम! भाजपकडून प्रयत्न सुरू, विधान परिषद जागा वाटपावरून तिढा; रवींद्र चव्हाण अ‍ॅक्शन मोडवर

Ravindra Chavan Meets Eknath Shinde : विधान परिषदेसाठी जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपने चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शिवसेना सहा जागांसाठी ठाम असल्याचे चित्र आहे.

Roshan More

Eknath Shinde News : स्थानिक स्वराज संस्थांमधून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच आहे. तब्बल 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र, जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत एकमत होत नसल्याचे वृत्त आहे. भाजपने 12 जागांवर दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि शिवसेनेला फक्त चार जागांची तयारी दर्शवली आहे.

भाजपच्या या ऑफरला शिवसेनेकडून नकार देण्यात आला आहे. सहा ते सात जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. कमीत कमी सहा जागा तरी मिळाल्या पाहिजेत, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

जागावाटपावरून उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दाखल झाल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. चव्हाण यांनी शिंदे यांची भेट घेतली असून ते जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिंदेच्या शिवसेनेकडून 6 जागांवर दावा आहे मात्र भाजपकडून सध्या फक्त 4 जागा देण्याची सहमती आहे. त्यामुळे यावर तोडगा कसा निघणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. काही जणांकडून स्वबळावर लढण्याचा आग्रह केला जात आहे मात्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते युती करण्याच्या बाजुने आहेत.

जागांची आदलाबदली होणार?

रायगडमधील जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. मंत्री भरत गोगावले यांना आपल्या मुलाला संधी मिळावी यासाठी या जागेवर दावा केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युती झाली तर काही जागांमध्ये आदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजन साळवी इच्छुक

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले राजन साळवी यांनी या निवडणूक आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. साळवी हे उमेदवारीसाठी अॅक्टवी झाले आहेत. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांनी देखील दंड थोपटण्याची तयारी केली असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT