Bharat Gogawale's car
Bharat Gogawale's car Sarkarnama
मुंबई

बंडखोर आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात; तिसरा बंडखोर अपघाताला सामोरे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) महाडचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे. यामध्ये सात गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. आमदार गोगावले हे सुखरूप आहेत. आठवड्याभरात तीन बंडखोर आमदारांसोबत अपघाताची घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताफ्यातील गाडीलाही अपघात झाला होता. (Rebel MLA Bharat Gogawale's car accident)

आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला मुंबईतील ‘फ्री वे’ वर आज सकाळी अपघात झाला आहे. यामध्ये सात गाड्या एकमेकांन धडकल्या आहेत. त्यात गोगावले यांच्या गाडीचे पुढच्या बाजूने नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. भरत गोगावले हे सुरू असल्याचे सांगण्यात आले. आमदार गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आहेत.

दरम्यान, या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबईतील आकाश केंद्राच्या मार्गावर अपघात झाला होता. शपथविधी झाल्यानंतर लगेच हा अपघात झाला होता. त्यानंतर `काय ती झाडी, काय डोंगार, काय ते हाटील, समद ओकेमध्ये हाय`, फेम सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हेही एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. मुंबईतील आकाशवाणी या आमदार निवासातील त्यांच्या खोलीच्या छताचा भलामोठा भाग कोसळला होता. शहाजी पाटील तेव्हा आमदार निवासातील याच खोलीत पण दुसऱ्या रुममध्ये होते. त्यामुळे त्यांना काही दुखापत झाली नाही.

दुसरीकडे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट हे २० दिवसानंतर शहरात आले होते. त्यावेळी सेव्हनहिल उड्डाणपुलावर माध्यमाच्या गाडीचालकाने अचानक ब्रेक लावला. पाठीमागून वेगात येणारी शिरसाट यांची गाडी येऊन त्यावर धडकली होती. नव्या कोऱ्या मर्सिडीजच्या समोरचा भाग बराच डॅमेज झाला होता.

शिरसाट यांच्या मागून देखील अनेक गाड्या येत होत्या. समोरच्या चालकाने ब्रेक दाबला म्हणून शिरसाटांची गाडी त्या गाडीवर धडकली, तर मागची गाडी शिरसाटांच्या गाडीला धडकली. त्यामुळे समोरच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजुंनी मर्सिडीजचे बरेच नुकसान झाले होते. या प्रकारामुळे शिरसाट चांगलेच संतापले होते, त्यांनी समोरच्या आणि मागच्या दोन्ही गाडीच्या चालकांना फैलावर घेतले होते. बंडखोर आमदारांबाबत घडलेल्या या घटना कशाच्या संकेत देत आहेत, याची मात्र चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT