Mla Tanaji Sawant Sarkarnama
मुंबई

Tanaji Sawant : सामंतांच्या गाडीवर हल्ला ; तानाजी सावंतांचा शिवसेनेला इशारा ; म्हणाले..

शिवसैनिक तानाजी सावंत यांना शोधत होते, मात्र उदय सावंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुण्यात काल (मंगळवारी) सायंकाळी आमदार उदय सामंत (uday samant) यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेला बबनराव थोरात यांना जबाबदार धरले जात आहे. त्यांना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील काळाचौकी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. आज पहाटे साडेपाच वाजता पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने काळाचौकी पोलिस ठाण्यात येऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. (Uday Samant Attack LIVE Updates)

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला असला तरी हल्लेखारांना शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट होता, असे शिवसैनिकांच्या विधानावरुन दिसते. तानाजी सावंत यांची गाडी समजून त्यांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. शिवसैनिक तानाजी सावंत यांना शोधत होते, मात्र उदय सावंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

कार्यकर्त्यच याबाबत रिअॅक्शन देतील

याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. "या बाबत आपण ४ ते ८ दिवसात प्रतिक्रिया देऊ. आमचे कार्यकर्त्यच याबाबत रिअॅक्शन देतील," असा सूचक इशारा तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिला. "जशास तसे उत्तर देण्यात येईल," असाच अर्थ तानाजी सावंत यांच्या प्रतिक्रियेतून निघतो.

शिंदे गटातील आमदारांना मारहाण करु..

तानाजी सावंत यांच्या विधानानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट एकमेंकासमोर उभे टाकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

"आम्हाला वाटलं तानाजी सावंत आहेत, म्हणून आम्ही ही गाडी अडवली, पण ती उदय सामंत यांची गाडी होती. तानाजी सावंत हे गद्दार असून ते पळून गेले आहेत. पुण्यात शिंदे गटातील आमदार दिसले तर त्यांना मारहाण करु," असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

रत्नागिरीमध्ये पडसाद

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे पडसाद आता रत्नागिरीमध्ये उमटू लागले आहेत. उदय सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी शहरात सामंत समर्थकांनी बॅनर लावले आहेत. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे बॅनर लावले आहेत. शहरातील प्रमुख चार ते पाच ठिकाणी मध्यरात्री बॅनर लावत सामंत समर्थकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. शिवसेनेच्या शाखेत समोरच जाहीर निषेध, विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते. 'असे हल्ले करणारे हे भ्याडच!' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. उदय सामंत यांनी मध्यरात्री ट्वीट करत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT