Sambhuraje desai - shahaji patil  sarkarnama
मुंबई

शिवसेनेतील सर्वात आधी कोण फुटलं? : शहाजी पाटील अन् शंभूराजे देसाई

Shivsena | Eknath Shinde | Shambhuraje Desai : बंडखोर आमदारांचा गट भाजपसोबत जाणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना (Shivsena) पक्षात सध्या अभूतपूर्व बंडाळी झाली असून पक्षात उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी जवळपास ३८ आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात फुटून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातील सर्व आमदार गुजरात येथील सुरतमध्ये गेले आणि तिथून ते गुवाहटीला रवाना झाले. मात्र या सर्व आमदारांपैकी सर्वात आधी कोण फुटले याची माहिती आता समोर आली असून याबाबत बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. शिवाय शिंदे यांच्या गटाला मंत्रिपदांची चांगली संख्या मिळणार असल्याचेही आमदार पाटील या व्हायरल क्लिपमध्ये सांगत असल्याचे ऐकू येत आहे. तसेच हे सरकार सत्तेत आल्यानंतर सांगोला मतदारसंघात ऐतिहासिक विकास होणार असल्याचा दावा शहाजी पाटीय या क्लिपमध्ये करत आहेत. (Political Crisis in Maharashtra)

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधत असलेला व्यक्ती शहाजी पाटील यांना यो गोष्टी कधी घडणार असा सवाल विचारत आहेत. यावर बोलताना ते म्हणतात, साहेब निर्णय घेणार, साहेबांच्या मनावर. पण एक सांगतो, सरकार १०० टक्के झालं, फडणवसी साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री. चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला मिळणार, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. (Shivsena | Eknath Shinde Latest News)

याच ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी पाटील सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात आधी ते स्वतः आणि पाटणचे आमदार, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे फुटले. त्यांनीच सर्वात आधी सुरतच्या दिशेने पावलं वळवली. याबाबत बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले, लढाई जिंकले आहे. पहिले पाऊल सुरतेला लागलं ते शंभूराजे देसाई आणि शहाजी राजाराम भोसले पाटील. पहिल्यांदा एन्ट्री आम्हा दोघांच्या आहेत. तिथेच म्हटलं शंभूराजे देसाई यांना लढा १०० टक्के यशस्वी होणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT