मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (ByElection) आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध (unopposed) निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर लटके यांनी भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानत ही निवड म्हणजे आपले पती रमेश लटके यांच्या कामाची पावती असल्याचे म्हटले आहे. (Rituja Latke's first reaction after unopposed election....)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटेल यांच्या माघारीची घोषणा केली. त्यानंतर ऋतुजा लटके बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजपला अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. तसेच, रमेश लटके यांचे सर्वांशी असलेले सहकार्याचे नाते, त्यांच्या कामाची पावती तसेच त्यांचे सर्वपक्षीय लोकांशी असलेले संबंध यामुळे आज मला सर्वांचा आशीर्वाद मिळालेला आहे, असे मी मानते.
सर्वपक्षीय नेत्याचे आभार मानते. माझे पती राजकीय क्षेत्रात होते. त्यामुळे त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. त्या मैत्रीची कदर केल्याने आज माझी बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, तसेच आमदार प्रताप सरनाईक यांचे मी सदैव ऋणी राहीन. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय असणार आहे. पोटनिवडणूक झाली असली तरी मीच विजयी झाले असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.