lalu prasad yadav
lalu prasad yadav sarkarnama
मुंबई

लालू प्रसाद यादव यांना गंभीर दुखापत ; रुग्णालयात दाखल

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री,आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) हे रविवारी पायऱ्यावरुन पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (lalu prasad yadav news)

त्यांचा हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना दोन महिने उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. रविवारी त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली.

लालू प्रसाद यादव हे सध्या पाटणा येथे राबडीदेवी यांचे निवासस्थान १० सर्कुलर रोड येथे राहतात. या ठिकाणी पायऱ्यावरुन उतरतांना त्यांचा तोल गेल्याने ते पडले. लालू प्रसाद यादव यांना मधुमेह ,किडनीचा आजार, रक्तदाब, थॅलेसेमिया, मेंदूचे आजार, डोळ्यांचे आजार आदी विविध आजार असल्याचे एका अहवालात म्हटलं आहे.

उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना दोन महिने घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लालू प्रसाद यादव हे सध्या चारा गैरव्यवहारात जामिनावर बाहेर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT