Deepak Kesarkar News : ऑडिशनसाठी मुलांना बोलावून त्यांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणी मानवाधिकारी आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान. या प्रकरणात माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मृत आरोपी रोहित आर्यासोबत वाटाघाटी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहे. वाटाघाटींदरम्यान केसरकर यांनी आर्यासोबत बोलणे टाळले होते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. या प्रकरणी केसरकर यांचीही चौकशी होणार आहे.
ओलीसनाट्यामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी भूतकाळात घडलेल्या काही घडामोडी अर्थात स्वच्छता मॉनिटर, माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे श्रेय व मोबदला न मिळाल्याने आर्याने केलेली आंदोलने आणि समविचारी सहकाऱ्यांकडे आर्याने वेळोवेळी व्यक्त केलेल्या भावना नोंदवून घेतल्या जातील, त्यांची शहानिशा केली जाईल, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ओलीसनाट्य घडले तेव्हा मुलांच्या सुटकेसाठी मुंबई पोलिस दलाचे उपआयुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी आर्यासोबत वाटाघाटी सुरू केल्या. त्यात आर्याने एकदाच केसरकर यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी पुढे केली.
पोलिसांनी केसरकर यांना फोन लावला; मात्र केसरकर आणि आर्या यांचे बोलणे होऊ शकले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.या दोघांचे बोलणे का होऊ शकले नाही, यावरूनही संभ्रमित करणारी माहिती प्राथमिक तपासातून गुन्हे शाखेला मिळाली आहे.
आरोपी आर्याच्या निमंत्रणावरून पवईच्या आरए स्टुडिओत सुरू असलेल्या आभासी ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या, लहान मुलांसोबत संवाद साधणाऱ्या, सेल्फी काढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मंगळवारी चौकशीस बोलावल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी आरए स्टुडिओला भेट दिल्याचे कबूल केले. ही भेट आगामी चित्रपटाबाबत चर्चेसाठी होती, असे त्यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.