Rohit Pawar
Rohit Pawar  Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : रोहित पवारांच्या राऊतांना हटके शुभेच्छा : '९ वाजताच अनेकांचे १२ वाजवणारे...'

सरकारनांमा ब्यूरो

मुंबई : कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटातचे नेते संजय राऊत यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या हटके शुभेच्छांची आता जोरदार चर्चा आहे. राऊतांना शुभेच्छा देतानाही पवार यांनी विरोधकांना डिवचल्याचे दिसून येते.

रोहित पवार ट्विट करत संजय राऊतांना शुभेच्छा देताना म्हणतात की, रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे आणि 'मोडेल पण वाकणार नाही, कुणापुढं झुकणार नाही', हा मराठी बाणा जगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदीर संजय राऊत साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्यासाठी आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!

शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी सकाळी नऊ वाजताच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांच्या उल्लेख करत, विरोधकांवर केल्या जाणाऱ्या टीकेवर आणि विरोधकांकडून झालेल्या हल्ला परतवून लावण्याच्या संजय राऊत यांच्या कुशलतेचा विशेष उल्लेख केल्याने, पवारांच्या या शुभेच्छांची एकच चर्चा होत आहे. या शुभेच्छांमधून पवार यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचीही चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT