Mumbai News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाबाबत अनेक शंका व संशय व्यक्त केले जात आहेत. अजित पवार यांचा विमान अपघात होता की घात याबाबत उलटसुलट चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य माणसांकडूनही केले जात आहेत. याबाबत एकीकडे या दुर्घटनेवर संशय व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे अजितदादा जिवंत असल्याचेही दावे सोशल मीडियावर समोर येत आहे. याचदरम्यान, कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी या अपघाताबाबत मोठा दावा केला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता.10) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयीचं मोठं विधान केलं आहे. त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या पहिल्या पाच मिनिटांतच अनेक मोठे दावे करतानाच अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
रोहित पवार म्हणाले, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि तुमच्या मदतीनं मी लोकांपर्यंत पोहोचत आहे. काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकले. ते व्हिडिओ कसेत, की दादा परत येतील का,सहाजण विमानात होते. सहावे व्यक्ती अजितदादा होते.जी बॉडी तिथे सापडली, ती अजितदादांची नव्हतीच.? अजितदादा आज येतील,उद्या येतील, पण मला त्या लोकांना सांगायचं आहे की, आज जर अजितदादा परत आले, मी सुध्दा त्यांना घट्ट् मिठी मारेल असंही त्यांनी म्हटलं.
याचदरम्यान, रोहित पवार म्हणाले,अजितदादांचा अॅक्सिेडंट झाल्यावर सहा दिवस दररोज ज्यावेळी मी झोपेतून उठत होतो. त्यावेळी मी कुठेतरी घाणेरडं स्वप्नं तिथं बघितलं आहे, ज्यात अजितदादांचा अॅक्सिेडंट झाला आणि ते फक्त स्वप्नंच आहे. आणि खऱ्या अर्थानं ही गोष्ट तिथं घडलीच नाही असं मला वाटत होतं. मला लोकांना एवढंच सांगायचं आहे, जे दादांना झालं नाही असं सर्वांना वाटतं, तसं नसून ही घटना झाली आहे. पण आज दादा आपल्यात नसले तरी विचाराने ते आपल्यासोबत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी रोहित पवार यांनी माध्यमांना दिली.
अजितदादांचा अपघात झालाच नाही असंच मला वाटतं होतं. परंतु, जेव्हा दादांचा एक जळलेला स्वेटर, त्यांची चप्पल आणि दादांचे घड्याळ मी पाहिले. दादा दररोज घड्याळ घालायचे. ते घड्याळ 15 मिनिटे नेहमी पुढे असायचे. त्या घड्यााळात 9 वाजले होते. ते घड्याळ बंद पडलेले होते. ते पाहून अजितदादा हयात नसल्याचं मला समजलं, असं रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
या अपघाताविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा मुंबई ते बारामती प्रवास हा 210 किलोमीटर होता. त्यासाठी विमानाला 27 मिनिटं लागणार होते.संबंधित विमान हे व्हिएसआर नावाच्या कंपनीचं होतं. ते अमेरिकेत विमान तयार झालं होतं. या विमानात अजितदादा हे लेफ्ट साईटला बसले असावेत,असां अंदाजही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तर दुसऱ्या सेक्शनमध्ये बॅगा होत्या. तसेच पाठीमागे पेट्रोलच्या टाक्या आहेत. या कंपनीची लेअरजेटबाबत त्यांची देशात मोनोपॉली आहे. सर्वाधिक लेअरजेटची विमाने त्यांच्याकडे असल्याचा दावाही पवार यांनी अजितदादांच्या अपघाताविषयी बोलताना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.