Rohit Pawar, Eknath Shinde
Rohit Pawar, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : व्वा रे महाराष्ट्र सरकार ; असे रोहित पवार का म्हणाले ?

सरकारनामा ब्युरो

Rohit Pawar : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीत आहेत, त्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या (shinde government)याच आदेशावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपा सरकारवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी टि्वट करुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

"निवडणूक गुजरातची सुट्टी महाराष्ट्रातील गावांना...निवडणूक गुजरातची मंत्रिमंडळ बैठक रद्द महाराष्ट्राची...निवडणूक गुजरातची उद्योग पळवले महाराष्ट्राचे आणि भविष्य हिरावले महाराष्ट्रातील युवांचे...व्वा रे महाराष्ट्र सरकार...!" असे रोहित पवारांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी यावर सडेतोड टीका केली होती. "गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. उद्या पाकिस्तानमध्ये निवडणुका असतील तर पूर्ण देशाला सुट्टी जाहीर करणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

“येथे बऱ्याच वर्षांपासून गुजराती लोक राहतात. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक असते तेव्हा कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सुट्टी असते का? हा काय नवीन प्रकार आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की गुजरातचे हे मला समजत नाहीये. उद्या पाकिस्तानच्या निडणुकीसाठी पूर्ण देशात सुट्टी जाहीर करतील,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT