Maanikrao Kokate Rummy Controversy Sarkarnama
मुंबई

Maanikrao Kokate Controversy : "भाजपवाल्यांनी कोकाटेंना..." कृषिमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचा हल्लाबोल

Maanikrao Kokate Rummy Video Controversy : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कृषी मंत्री मोबाईलमध्ये रमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विधीमंडळातला असल्याचा सांगितलं जात आहे.

Jagdish Patil

Maanikrao Kokate Rummy Controversy : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कृषी मंत्री मोबाईलमध्ये रमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विधीमंडळातला असल्याचा सांगितलं जात आहे.

त्यामुळे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे तिथे हे मंत्री महोदय रमी खेळत आहेत, असं म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर सडकडून टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का? याचा विचार करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले," भाजपवाल्यांनी कोकाटेंना केवळ नावालाच मंत्री केलं आहे. त्यामुळे त्यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहेत.

किंवा अधिकार नसल्यामुळे त्यांना काही करायची इच्छा नसेल. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अशी अवस्था झाली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांना या पदावर ठेवायचं की नाही? याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. त्यांना शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर अशा मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का? हा विचार मुख्यमंत्री करतील."

रोहित पवारांच्या व्हिडिओत नेमकं काय?

दरम्यान, रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही.

म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?, असं म्हणत त्यांनी सरकार आणि कोकाटेंवर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT