Rupali Chakankar News : Sarkarnama
मुंबई

Rupali Chakankar News : रूपाली चाकणकरांनी घेतला गोगावलेंचा समाचार; म्हणाल्या, 'पुरूषी मानसिकता...'

Rupali Chakankar on Statemet of Bharat Gogawale : "महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदे आणि पालकमंत्रीपदावरून दावेदारी सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) या दोन नावांची चर्चा आहे. मात्र पालकमंत्री पद आपल्यालाच हवे, असा दावा करताना गोगावलेंनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये नवा वाद उफाळून येत आहे.

मी त्यांच्यापेक्षा (आदिती तटकरे) चांगलं काम करू शकतो, शेवटी महिला आणि पुरुषामध्ये थोडा तरी फरक येतो ना, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना केलं. यामुळेच आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनीही गोगावलेंचा समाचार घेतला आहे. गोगावलेंच्या वक्तव्यातून पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, असं टीकास्त्र चाकणकरांनी सोडले. (Latest Marathi News)

चाकणकर ट्विट करत म्हणाल्या, "आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे."

"भरत गोगावले ,आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना 'सखी राज्ञी जयती' असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी.आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते ," अशा शब्दात रूपाली चाकणकरांनी गोगावलेंचा समाचार घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT