Ganesh Naik
Ganesh Naik sarkarnama
मुंबई

रुपाली चाकणकरांमुळे भाजपचा बडा नेता आला चांगलाच अडचणीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी तपास करून दोन दिवसात अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला आहे. यामुळे नाईकांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा आता लागणार आहे.

या महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही, या महिलेला व तिच्या मुलाला पोलिसांनी सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार नाईकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही तिने केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

संबंधित महिलेने याबाबत दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे धाव घेतली होती. नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे. नाईक हे 1993 पासून माझे लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच ठार मारण्याची धमकी देऊन माझे शोषण केले, असे या महिलेने म्हटले आहे.

आमदार नाईक यांच्या धमक्यांमुळे मला त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहावे लागत आहे. मला वैवाहिक अधिकार मिळावेत तसेच, माझ्या मुलाला पितृत्वाचा अधिकार मिळावा, यासाठी या महिलेने नाईक यांच्याकडे तगादा लावला होता. यावर नाईक यांनी या महिलेला व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. गणेश नाईक यांचा मुलगा संदीपही या महिलेला गणेश नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून इतरत्र निघून जावे यासाठी या तिला व तिच्या मुलाला ठार मारण्याच्या धमक्या देत होता,, असा दावा या महिलेने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT