Rupali Chakankar
Rupali Chakankar  sarkarnama
मुंबई

रुपाली चाकणकर होणार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Womens Commission) निवड जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात होती.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची महिला अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. त्याच प्रमाणे अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते. रुपाली चाकणकर या भाजपच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही बडती मिळाल्याचे बोलले जात आहे.

चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादीचे महिला संघटन मंजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात विविध आंदोलने केली आहेत. महामंडळाच्या नियुक्तीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समान वाटप झाल्याचे सांगण्यात येत आहे. अगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमिवर मंहामंडळावरील नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भाजप राज्य सरकारवर टीका करत आहे. चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT