LPG Gas Cylinder Price Hike
LPG Gas Cylinder Price Hike Sarkarnama
मुंबई

BJP_हटाओ_देश _बचाओ; गॅसचे दर वाढताच रुपाली ठोंबरे पाटलांचा केंद्रावर निशाणा

सरकारनामा ब्युरो

LPG Gas Cylinder Price Hike

मुंबई: देशभरात आजपासून (७ मे) 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात (LPG Gas Cylinder Price Hike) वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा त्यामुळे घरगुती एलपीजी गॅसच्या 14.2 किलोच्या एका सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना आता 999.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

सिलेंडर दरवाढीच्या मुद्द्यावरुन देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. असे असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील यांनीदेखील ट्विट करत केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ''महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला. चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे, गॅसमध्येच भरमसाठ वाढ झाली. परत चुलीकडे जावेच लागणार, पोटाचा प्रश्न आहे ना. कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र,'' अशा शब्दांत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. तसेच, #shame #BJP_हटाओ_देश _बचाओ असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 मे रोजी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder price hiked) दरात तब्बल 102.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे हा सिलेंडर आता 2 हजार 355.50 रुपयांना मिळत आहे. एकाच आठवड्यात झालेल्या या दरवाढीमुळे हॉटेलसह घरचे जेवणही महागले असून गृहीणींवरील आर्थिक भारही वाढणार आहे. (LPG Gas Cylinder rate increserd news)

मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. या सर्व वाढीच्या दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन देशभरात नुकताच उज्जवला दिवस साजरा करण्यात आला. यात 5 हजार एलपीजी पंचायतचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुरक्षित आणि सातत्याने वापरासाठी माहिती दिली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT