Sachin Sawant, Uddhav Thackeray
Sachin Sawant, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

पटोलेंमुळे दुखावलेल्या सावंताना ठाकरेंनी काय दिला सल्ला?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) हे मुख्य प्रवक्तेपदावरून दूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुधवारी भेट घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे सहकारी मित्र तसेच मूळ विदर्भातील असलेल्या अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्ता नेमल्याने सावंत नाराज असल्याचे मानले जात आहे. त्यातच त्यांनी आज (ता.२०) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले.

राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघटना मजबूत करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी सोमवारी जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. पक्षाचे विद्यमान प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यावर मुख्य प्रवक्तेपदाची, तर डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग आणि सेलच्या प्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. पटोले यांनी ही दोन्ही पदे आपल्या विश्वासातील आणि विदर्भातील नेत्यांकडे सोपवली आहेत. त्यामुळे त्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. त्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सचिन सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत येण्याचा सल्ला दिला की काँग्रेसमध्येच थांबण्याचा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वादळ उठले आहे. मीडिया विभागाची जबाबदारी काढून घेतल्यामुळे सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सावंत यांनी हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. मागील १० वर्ष सचिन सावंत पक्षाचे मीडिया इंचार्ज म्हणून काम केले आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना डावलण्यात आले आहे. त्यातच पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करून त्या पदावर सचिन सावंत यांना डावलून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पटोले यांनी पक्षाच्या कामात सुसुत्रता आणि वेग यावा, यासाठी काँग्रेसच्या विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले. यामध्ये माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. माध्यम आणि संवाद विभाग, तसेच मुख्य प्रवक्तेपद हे लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या समितीत सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश करण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT