Prakash Kapde, Sachin Tendulkar, Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Sachin Tendulkar News: '...तर शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच सचिन तेंडुलकरचा त्याच्या घरासमोर पुतळा जाळणार!'; बच्चू कडूंनी दिली वॉर्निंग

Sachin Tendulkar Bodyguard News: सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्यानंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Jagdish Patil

Sachin Tendulkar Bodyguard News: सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवाय सचिनने भारत सरकारने दिलेला भारतरत्न पुरस्कार परत करावा अशी मागणीदेखील बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, "रमीच्या व्यसनातून आत्महत्या अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी गोष्ट आहे. जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचा जीव वाचण्यासाठी काम करतो त्या अंगरक्षकावर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) जाहिरातीमुळे आत्महत्या करायची वेळ आली असेल, तर ही जबाबदारी सचिन तेंडुलकरने स्वीकारली पाहिजे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या सचिन तेंडुलकरला आम्ही भारतरत्न म्हणून स्वीकारलं त्यांच्या ऑनलाइन रमीच्या (Online Rummy) जाहिरातीमुळेच त्यांचा अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे सचिन तेंडुलकरने ऑनलाइन रमीची ती जाहिरात सोडली पाहिजे नाहीतर भारतरत्न पुरस्कार परत केला पाहिजे. अन्यथा सहा जूनला शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशीच त्याच्या घरासमोर त्याचा पुतळा जाळून आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिला.

निवडणूक मूळ मुद्यांपासून फार दूर

तर यावेळी बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. ते म्हणाले ही लोकसभा निवडणूक धर्मयुद्ध म्हणून समोर येत आहे, जातीपातीच्या राजकारणाला मोठे उत्तेजन मिळाले आहे. या निवडणुकीत जातीचे व धर्माचे गणित मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजपकडून झाला. ही निवडणूक मूळ मुद्यांपासून फार दूर गेली आहे.

मुंबईमध्ये रोज सहा लाख लोक फूटपाथवर झोपतात, आणि दुसरीकडे सहा हजार एकर जमीन 6 कुटुंबांजवळ आहे, हा ही मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान यायला पाहिजे होता, पण तो आला नाही. या संदर्भात आम्ही जून महिन्यात गोदरेजच्या मैदानात जी 3000 एकर जमीन गोदरेज कंपनीला इंग्रजांनी दिली ती त्यांनी सरकार दरबारी जमा करावी. नाहीतर जे लोक बेघर आहेत त्यांच्या हवाली आम्ही ती जमीन करणार असल्याचं कडूंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT