Sadabhau has no other job now; They should not use such language says Minister Shambhuraj Desai
Sadabhau has no other job now; They should not use such language says Minister Shambhuraj Desai 
मुंबई

सदाभाऊंना आता दुसरे कामच नाही; त्यांनी अशी भाषा वापरू नये....

सरकारनामा ब्यूरो

सातारा : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सडेतोड उत्तर दिले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी व वैद्यकिय सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. सध्या सदाभाऊंना दुसरे कुठले काम नसल्याने त्यांना असले काहीतरी सूचत असेल. त्यांनी अशी भाषा वापरू नये, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.    

जिल्हाधिकारी कार्यालयातून मंत्री शंभूराज देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षकांशी
संवाद साधला. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपाविषयी विचारले असता ते म्हणाले, सदाभाऊंना आता दुसरे काहीही काम नाही.

आम्हाला कोविडचा संसर्ग रोखण्याचे काम आहे. मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्व मंत्री या कामात व्यस्त आहोत. सदाभाऊंना दुसरे कुठले काम नसल्याने त्यांना असे काही तरी सूचत असेल. त्यांनी अशी भाषा करू नये. ते सुध्दा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलेले आहे. सध्या राज्य कुठल्या परिस्थितीतून चालले आहे. मुख्यमंत्री प्रामाणिकपणे प्रयत्न करून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासोबतच वैद्यकिय सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करता आहेत. असे असतानाही सदाभाऊ खोतांसारख्या व्यक्तीने असे चुकीचे आरोप करणे योग्य नाही. त्यांनी अशी भाषा वापरू नये, असा इशारा
मंत्री देसाई यांनी दिला आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT