Sadabhau Khot, jitendra awhad
Sadabhau Khot, jitendra awhad sarkarnama
मुंबई

सदाभाऊ खोतांचे आव्हाडांना प्रत्युत्तर ; 'जनतेनंही ठरवलयं २०२४ मध्ये बदल हवाच

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असून त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत. 2024 मध्ये होणारी निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहे. त्यावेळेसही महाविकास आघाडीचे सरकार येऊन शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी नुकतेच सांगितले आहे.

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही आव्हाडांनी स्पष्ट केलं. आव्हाडांच्या विधानाला रयत क्रांतीचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सदाभाऊ खोत यांनी टि्वट करुन आव्हाडांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

सदाभाऊ खोत आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''जनतेनंही ठरवलयं २०२४ मध्ये बदल हवाच. महाविकास आघाडी सरकारचे कुशासन ते भाजपचे सुशासन. उघड दार देव आता उघड दार देव ....'' असे टि्वट करीत सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांना उत्तर दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी (ओबीसी) राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘मागासवर्गीय आयोगाला सरकारकडून लागणारी आवश्यक मदत, पुरेसा स्टाफ, पुरेसे पैसे, संपूर्ण माहिती. यामधून एकही गोष्ट ही महाभकास आघाडी सरकार आयोगाला द्यायला तयार नाही. अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसीना आरक्षण द्यायचं नाही आणि केंद्राचा नावाने हात पाय घासायचे आहे.’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले, ही तांत्रिक बाब आहे, यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे आणि यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आता १३ डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT