St Strike -gunratna sadavarte  St Strike
मुंबई

ST आंदोलन पेटविणाऱ्या सदावर्तेंना संघटनांचा `बाय, बाय` : तुमची गरज नाही..

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी आज ST कामगार संघटनांच्या कृती समितीशी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एस.टी. विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कृती समितीच्या पदाधिकांऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. (ST Strike Latest News)

एसटी विलीनीकरणाच्या विषयावर आज अनिल परब आणि शरद पवारांशी चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीचे पदाधिकारी अक्षय गुजर यांनी कृती समितीच्या वतीने बाजू मांडली. 'एसटी विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होते. पण एसटी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आता सदावर्ते यांच्याकडून वकिली मागे घेतली असल्याची घोषणा अक्षय गुजर यांनी केली.

सदावर्ते यांच्या आक्रस्ताळेपणामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली. ही चूक सुधारून नवीन वकील आम्ही नेमले आहेत. याबाबत त्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यापुढे सदावर्तेंनी आमची बाजू कोर्टात मांडण्याची गरज नाही. वकिलाने न्यायालयात प्रश्न मांडायला हवेत, त्यांनी व्यवस्थित मांडले नाहीत, म्हणून आम्हाला न्याय अजून मिळाला नाही. त्यामुळे यापुढे अॅड सतीश पेंडसे नावाचे नवीन वकील नेमण्यात आले आहे. सतीश पेंडसे यापूढे न्यायालयात आपली बाजू मांडतील. असेही त्यांनी सांगितले.

त्याबरोबर, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याची ग्वाही मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच, एसटी विलीनीकरणाचा जो मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यावर १२ आठवड्यात त्रिसदस्यीय समिती आपली बाजू मांडणार आहे. त्यानंतर न्यायालय जो निर्णय तो आम्हाल मान्य असेल, मात्र कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर हजर व्हावे, अशी विनंतही अक्षय गुजर यांनी केली. मी सुरुवातीपासून वकिल साहेबांना विरोध केला होता. एसटी टिकली पाहिजे, एसटी गरिबाची आहे. पण त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे आज कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. मात्र आता वकील साहेबांच्या आक्रस्थाळेपणाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT