Sahar Shaikh Not Reachable | Fake Caste Case Sarkarnama
मुंबई

Sahar Shaikh : 'कैसे हराया' फेम सहर शेख अन् वडील दोघेही गायब, बोगस दाखला प्रकरण अंगलट?

Sahar Shaikh Not Reachable : ठाणे महापालिकेतील MIM नगरसेविका सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 16 Apr : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झालेल्या एमआयएमच्या 'कैसे हराया' फेम नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणामुळे आता त्यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं आहे.

या प्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख नॅाट रिचेबल असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोगस जात प्रमाणपत्र दाखला प्रकरण अंगलट येण्याची चिन्ह दिसताच सहर शेख गायब झाल्याचं बोललं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाणे महापालिकेतील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून सहर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

शिवाय या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची अहवाल लवकरच येणार आहे. अशातच आता सहर शेख आणि त्यांचे वडील दोघेही नॉट रिचेबल झाल्याची माहिती आहे. तक्रारदाराने उत्तर प्रदेशातील गाजियाबादचे मूळ रहिवासी असलेल्या युनूस इक्बाल शेख हे महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप केला आहे.

तर मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत MIM पक्षाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय देखील झाला. विजयानंतरच्या रॅलीत बोलताना 'कैसे हराया' हे त्यांचं वाक्य चांगलंच व्हायरलं झालं होतं.

मात्र, आता वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर यांची अडचण वाढली आहे. तर हेच बोगस दाखला प्रकरण अंगलंट येच असल्याचं दिसताच सहर शेख आणि वडील युनूस शेख दोघेही नॅाट रिचेबल झाल्याची माहिती आहे. तर युनूस शेख यांनी पत्रकारांचे फोन घेणे टाळल्याचंही आता समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT