Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

ठाकरेंच्या अडचणी संपेना, 'मशाल'वर समता पक्षाचा दावा : वाद आयोगाच्या दारात!

Samata Party : १९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचं चिन्हं गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 'मशाल' चिन्ह देण्यात आले आहे, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नावाला मंजुरी मिळाली. शिंदे गटालाही 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह आयोगाकडून मिळाले आहे. मात्र आता ठाकरे गटाला मिळालेल्या 'मशाल' या चिन्हावर वाद घडून येण्याची चिन्हे आहेत. कारण मशाल या चिन्हावर दिवगंत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केला आहे. त्यांच्या पक्षाकडून पोटनिवडणूकीत उमेदवार देण्यात येणार असल्याचे समजत आहे.

१९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे. यासाठी त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. समता पार्टीच्या या आक्षेपावर आता येत्या बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे.

"२००४ साली समता पार्टीची राज्यपक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हेचिन्ह देण्यात आले आहे," असे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्रुनेश देवळेकर यांनी सांगितले. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला इ-मेल पाठवून आपण मशाल चिन्हावर दावा केल्याचाही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT