Bhagat Singh Koshyari, Sambhaji Raje Chhatrapati
Bhagat Singh Koshyari, Sambhaji Raje Chhatrapati sarkarnama
मुंबई

जीभ वारंवार घसरते आहे; योग्य राज्यपाल महाराष्ट्रसाठी द्यावा : संभाजीराजेही मैदानात

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनीही राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला.

या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भात ट्वीट केले. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत''

त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा'' असा हल्लाबोल संभाजीराजे यांनी केला.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यपाल कोश्यारींची केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. दीपक केसरकर म्हणाले, "राज्यपाल राजकीय व्यक्तीसारखी भाषण करू शकत नाही. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी, मुस्लिम, पारसी गुजरातीसह सर्वच समाजाचे योगदान आहे. मात्र, यात सर्वांत मोठा वाटा मराठी माणसाचा आहे,"

"एखाद्या समाजाने मुंबईतील पैसा काढला तर मुंबईत पैसा राहणार नाही, असे बोलणे म्हणजे राज्यपालांना मुंबईबद्दल माहिती नसल्याने हे वक्तव्य केले असावे," असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT