Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati  
मुंबई

संभाजीराजेंच लक्ष 2024? 'आता राज्यसभाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच'

सरकारनामा ब्युरो

Sambhajiraje Chhatrapati latest news update

मुंबई : शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभेच्या उमेदावारीचा प्रस्ताव देण्यात आला होता. राजेंना उमेदवारीसाठी शिवसेनेने पक्षप्रवेशाची अटही घातली होती. मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिल्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरातलाच दुसरा उमेदवार जाहीर केला. त्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजेंच्या समर्थकांनीही हा मुद्दा लावून धरला आहे.

संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले असून आता सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल केली जात आहे. ''संभाजीराजे आता केवळ राज्यसभाच नाही तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती होणार, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष २०२४" असा मजकूर छापण्यात आला आहे. यामुळे संभाजीराजे पुढे कोणती भूमिका घेणार,ते अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ते ठाम राहणार का? त्यांची पुढची रणनीती काय असेल, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- मराठा संघटना आक्रमक

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी राजे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ''संभाजीराजे यांना विरोध करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिकेत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करत आहेत. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनता उतरवेल.

2024 ला याची राजकीय किंमत मोजावी लागणार. एकीकडे प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना अटी शर्थी न टाकता राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दाखवता. मात्र ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढी वर्षे राजकारण करत आहात एवढी वर्ष सत्ता भोगत आहेत. या शिवसेनेचा शिव आमच्या छत्रपतींचा आहे, अशी टीकाही मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT