Sambhajiraje Chhatrapati  Sarkarnama
मुंबई

Shiv Jayanti : शिवनेरीवर संभाजीराजे मुख्यमंत्र्यांसमोरच संतप्त ; " शिवभक्तांना का अडवता ? ; किती दिवस सहन करणार..

Maharashtra Shiv Jayanti Celebration : शिवभक्तांना किल्ल्यांच्या पायथ्यालाच अडवले..

सरकरानामा ब्युरो

Maharashtra Shiv Jayanti Celebration : राज्यात आज (रविवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti 2023) उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित आहे, पण ते किल्ल्यावर गेले नाहीत. शिवनेरी किल्ल्यावर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोपही संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार प्रविण दरेकर आदी उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच शिवनेरीवर शिवजयंती साजरी करीत आहेत.

शिवजयंतीनिमित्ताने शिवनेरीवर शासकीय सोहळा असतो. सकाळी या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य शिवभक्तांना किल्ल्यांच्या पायथ्यालाच अडवले जाते. याबाबत अनेकवेळा शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, माजी खासदार संभाजीराजेंनी यांनी याबाबत आज थेट जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली.

"माझ्यासोबत आलेल्या सर्व तरुण शिवभक्तांना जो पर्यंत किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नाही," अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संभाजीराजेंची भूमिका समजून घेतली. पुढील वर्षांपासून यावर योग्य तो उपाय, नियोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले, "व्हीआयपीं लोकांसाठी सर्वसामान्य शिवभक्तांना का अडवता, आम्ही किती दिवस हे सहन करणार ?; सर्वांना दर्शनाचा अधिकार आहे, यासाठी दुजाभाव नको,"

शिवजयंतीनिमित्ताने आजपासून तीन दिवस शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांचे सादरीकरण करण्यात आले.

आज शिवजयंतीदिनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे."किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावलाच पाहिजे," छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर भगवा का लावू शकत नाही? तो लावलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र शासनाकडे ठामपणे ही मागणी केली पाहिजे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

एक वर्षाची मुदत आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देतो आणि जर पुढच्या शिवजयंतीला ध्वज फडकला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT