Eknath Shinde | devendra Fadnavis | sambhajiraje Chhtrapati  Sarkarnama
मुंबई

शिंदे-फडणवीस सरकार येण्याची पायाभरणी करणारा नेता आज त्यांना भेटला...

Eknath Shinde | devendra Fadnavis : सरकार सत्तेत येण्याची पायाभरणी ज्या नेत्यामुळे झाली ते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार येवून आता जवळपास २१ दिवस झाले आहेत. २९ जुले रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ३० जुनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी पार पडला. मात्र हे सरकार सत्तेत येण्याची पायाभरणी ज्या नेत्यामुळे झाली ते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांनी आज शिंदे-फडणवीसांची भेट घेतली.

या भेटीबाबात संभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhajiraje Chhtrapati) निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन दोघांचे एकत्रित अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी मराठा समाजाचे प्रश्नांसंदर्भात सरकारने बैठक लावून हे प्रश्न सोडवावेत अशीही मागणी केली. राज्यातील गडकोट बुरुजांच्या संवर्धानासाठीही राज्य सरकारने पुढाकार घ्यावा याबाबत चर्चा केली.

मागील महिन्यातील ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या २ आणि काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रत्येकी १ जागा निवडून येणार होती. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंनी मैदानात उतरुन सर्व पक्षांनी आपल्याला अपक्ष म्हणून राज्यसभेत पाठवावी अशी मागणी केली. यासाठी त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही पाठिंबा देण्याची मागणी केली.

मात्र शिवसेनेने संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची अट ठेवून अपक्ष उमेदवारी नाकारली. तसेच स्वतःच्या आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या मदतीने आणि अपक्ष इतर सहयोगी पक्षांच्या साथीने चौथी जागा लढविण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना या जागेवरून महाविकास आघाडीकडून मैदानात उतरविले. भाजपने देखील कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. निकालाअंती महाविकास आघाडीची जवळपास ११ मत फोडून धनंजय महाडिक विजयी झाले होते.

या निकालानंतर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड असंतोष असल्याचा सांगत तिकडच्या काही नेत्यांनी महाडिक यांची उमेदवारी कायम ठेवण्यास सांगितले असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीवेळी देखील हेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ठाकरे सरकार जावून शिंदे सरकार अस्तित्वात आले. मात्र याची पायाभरणी कुठे तरी संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारुनच झाली असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT