मुंबई

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंनी केले हात वर

समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्ज व्यवसायात सहभागी आहे का?

अनुराधा धावडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (८ नोव्हेंबर) सकाळी एक ट्विट टाकून खळबळ उडवून दिली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे जात प्रमाणपत्र व भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सतत टीका करणाऱ्या मलिकांनी आता थेट अभिनेत्रीक्रांती रेडकरच्या (Kranti Redkar) कुटुंबावर निशाणा साधला आहे.

मलिकांनी सोमवारी सकाळी वानखेडे यांची मेव्हणी व क्रांतीची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्याविषयी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांनाच एक सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्ज व्यवसायात सहभागी आहे का? पुणे न्यायालयात तिचं एक प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्ही याचं उत्तर द्यायलाच हवं, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

या प्रश्नावर आता समीर वानखेडेंनी उत्तर दिले आहे. ''त्यावेळी आपण नोकरीतच नव्हतो, त्यामुळे या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल, पण मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालो, २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले, मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध, असा प्रतिप्रश्न करत समीर वानखेडे यांनी हात वर केले आहेत.

दरम्यान नबाव मलिक यांनी क्रांती रेडकरच्या बहिणीवर असलेल्या आरोपांशी काही कागदपत्रेही जोडली आहेत, ट्विट करत नवाब मलिकांनी म्हटले आहे की, पुण्याच्या न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यांचा समीर वानखेडे यांच्याशी काय संबंध आहे. पुढील सुनावणी मार्च 2022 मध्ये आहे का, याची उत्तरे समीर वानखेडे यांनी द्यायला हवीत. धक्कादायक म्हणजे, हॉटेल ललितमध्ये वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका, पार्ट्या होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT