Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

आर्यनची अटक महागात! समीर वानखेडेंची अखेर उचलबांगडी

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे अडकले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्लिनचिट देण्यात आली आहे. त्याच्याविरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. याप्रकरणात काही त्रुटी आढळून आल्याची कबुली अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दिली आहे. त्यानंतर आता एनसीबी मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत. त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Sameer Wankhede News)

क्रूझ ड्रग्ज प्रकरणचा संशयास्पद तपास आणि जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करणे या दोन्ही गोष्टींमुळे वानखेडे अडचणीत आले आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालायने घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी तोंडघशी पडली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरवातीला वानखेडे यांच्याकडे होते. तसेच, वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही झाला आहे. यामुळे वानखेडेंच्या मागे ही चौकशी आता लागली आहे. यानंतर आता वानखेडेंची थेट चेन्नईला बदली करण्यात आली आहे. करदाते सेवा महासंचालनालयात त्यांची बदली करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांनीची क्रूझवरील डॅग्ज पार्टीवर छापा टाकून कारवाई करत आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. आर्यन खानला अडकवले जात असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. अखेर त्यांनी केलेल्या या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झालं आहे. आर्यनला एनसीबीने क्लिनचिट दिल्यानंतर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला होता. सॉरी, सॉरी म्हणत त्यांनी त्यावेळी यावर अधिक बोलण्यास नकार दिला होता.

दरम्यान, 'एनसीबी'चे उपमहासंचालक संजयसिंह यांनी आर्यन खानाला क्लिनचिट देण्याची तीन कारणे दिली होती.

आर्यन सुटण्याची ही आहेत तीन महत्वाची कारणे :

1. सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते आर्यनसाठी नव्हते. आर्यनने त्याला सांगितले होते की, ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, असं त्या मित्राच्या जबाबात आले होते.

2. आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.

3. आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. या तीन महत्वाच्या गोष्टी तपासात आढळून आल्या आहेत. त्यामुळे आर्यनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT