Sanjana Ghadi joins Shiv Sena in Presece of Eknath Shinde. Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News : ठाकरेंनी प्रवक्ता केलेल्या महिला नेत्याचा 4 दिवसांतच ‘जय महाराष्ट्र’; पतीसह शिंदे सेनेत प्रवेश

Sanjana Ghadi Left Uddhav Thackeray's Shiv Sena : मुंबई महापालिकेचे माजी नगरसेविका संजना घाडी यांनी रविवारी त्यांचे पती माजी नगरसेवक संजय यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला.

Rajanand More

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत आणखी एक धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या सेनेला सुरूंग लावत दोन माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे. विशेष म्हणजे ठाकरेंनी चार दिवसांपूर्वी प्रवक्तेपदाची माळ गळ्यात टाकूनही महिला नेत्याने शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई महापालिकेचे माजी नगरसेविका संजना घाडी यांनी रविवारी त्यांचे पती माजी नगरसेवक संजय यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. घाडी यांचा शिंदेसेनेतील प्रवेश ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी घाडींची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्या पक्षाच्या उपनेत्याही होत्या.

ठाकरेंच्या सेनेकडून चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीत घाडी यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्या नाराज झाल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर यादी दुरूस्त करून या यादीत घाडींचे नाव समाविष्ट करण्यात आले. पण पहिल्या यादीत नाव नसल्याने दुखावलेल्या घाडी यांची नाराजी अखेरपर्यंत दूर झाली नाही. त्यामुळे त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर घाडी दाम्पत्य सुरूवातीपासूनच ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे ठाकरेंनी त्यांना प्रवक्ते तसेच उपनेतेपद दिले होते. त्यांचा दहिसर, मागाठाणे आधी विधानसभा मतदारसंघात दबदबा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला या दाम्पत्यावरच अवलंबून राहावे लागणार होते. पण त्या दोघांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्याने या भागात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

ठाकरे यांना मागील काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. अनेक माजी आमदार, नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली आहे. बहुतेकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ठाकरेंची साथ सोडली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून ठाकरेंना आणखी धक्के मिळण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT