Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

राऊत थांबेनात; योगींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करत पुन्हा वापरला तोच शब्द...

संजय राऊत यांनी भाजपवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राऊत (Sanjay Raut) खुर्ची घेऊन जात असल्याच्या फोटो व्हायरल झाला आहे. यावरून भाजप नेते टीका करत आहेत. त्यांचा समाचार घेताना राऊत यांनी अपशब्द वापरले. आता पुन्हा एकदा राऊतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा व्हिडीओ शेअर करत त्याच भाषेत पलटवार केला आहे.

संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले होते की, मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत. त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असे सांगेन, असे राऊत म्हणाले होते. यानंतर भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला. राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. भाजपच्या महिला नगरसेवकांनी मुंबई पोलिसांत राऊतांविरोधात तक्रारही दिली आहे.

टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा ट्विट करत भाजपवर पलटवार केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ जोडला आहे. त्यामुळे आदित्यनाथ हे राऊत यांनी वापरलेला शब्दच बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओच्यावर राऊतांनी 'दुनिया में चु....की कमी नही, एक धूंडो तो हजार मिलेंगे... जरा योगिजी को सूनीये,' असं लिहिलं आहे. त्यामुळं आता आणखी वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले होते राऊत?

त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव, असे जरी कोणी नेते असते तरी त्यांनाही मी स्वत: खूर्ची आणून दिली असती. पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली. हे जर कोणाला आवडले नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे, असा टोला राऊत यांनी लगावला होता.

कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधे उभेही राहू दिले नाही. खुर्चीचे तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही राज्यभर आंदोलन करु असा इशारा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच भाजपच्या नगरसेविकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आमदार आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला जात असेल तर राऊतांवरही करावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT