Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राजकीय फडात T-20 वारं; ठाकरेंचा नेता म्हणतो, राज्यात 'त्रिफळा' उडवणारच!

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : भारतीय क्रिकेट टीमने T-20 सामना जिंकल्यानंतर राज्याच्या राजकारणाच्या फडातही तुफान फटकेबाजी रंगली आहे. विधिमंडळात शुक्रवारी टीम इंडियाचे कौतुक करण्यात आले.

त्यावेळी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीही त्यांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम दाखवून दिले.

सूर्यकुमारने घेतलेल्या कॅचच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचण्याची संधी साधली. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचा आता त्रिफळा उडणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

विधिमंडळात मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, सूर्यकुमार तुमचा कॅच कुणीही कधीही विसरणार नाही. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेटही कुणी विसरणार नाही. गेली दोन वर्षे आम्ही सर्व लोक बॅटिंग करत आहोत. तुमच्या खेळाने जनतेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो, तसाच आनंद, सुख, समाधान राज्यातील चेहऱ्यावर दिसावा याचसाठी आम्ही काम करत आहे.

शिवसेनेतून फटून महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंना या विधानानंतर संजय राऊतांनी Sanjay Raut सत्तेतून हटवण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. आता तुमच्या क्लिन बोल्डची वेळ आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. विधानसभेत तुमचे तिन्ही स्टम्प, म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उडणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात अंबादास दानवे Ambadas Danve यांच्यासमोरच ठाकरेंवर टीका केली होती. आता दानवेंनी, अजून सामना संपलेला नाही. राज्यातील सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील, त्यावेळी संपेल. त्या दिवशी कळेल कुणी कोणाची विकेट घेतली, कुणी कुणाला रिटायर्ड व्हायला भाग पाडले, जनतेने कुणाला घरी बसवले, हे त्याच दिवशी कळेल, अशी वॉर्निंगच दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT