मुंबई

'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा बचाव करणारे सीमाभागातील बांधवांना काय न्याय देणार?'

सरकारनामा ब्युरो

Karnatak Maharashtra Border Politics : नवी दिल्ली : पक्षाचं आणि संसदेचं काम करायला दिल्लीत आलो आहे. पण अन्याय आणि असत्याचा बुलडोझवर वारंवार फिरवला जात असेल तर त्यांच्याशी लढण्याची आमची मानसिक आणि सर्व प्रकारची तयारी आहे. सगळेच काही पळपुटे नसतात काही लढणारेही असतात. त्यामुळेच महाराष्ट्र टिकून आहे आणि देशात स्वातंत्र्याची मशाल पेटत राहिल. असा विश्वास खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलाय. दिल्लीत सकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे दोन्ही वेळेला युती सरकारच्या काळात बेळगाव संबंधीच्या विषयाचे खास मंत्री होते, चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यावेळी जबाबदारी होती. मग या दोघे कितीवेळा बेळगावला जाऊन आले. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मी जात होतो बेळगावला पण त्यांनी मलाही जाण्यापासून अटकाव केला. मी म्हणालो होतो, आपण या खात्याचे मंत्री आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही बेळगावात या, पण एकदाही चंद्रकांत पाटील बेळगावात गेले नाहीत. सीमाभागातील बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी आताचे मुख्यमंत्री कधी तिकडे पोहचले नाहीत आणि आता तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत

सर्वात आधी त्यांनी बेळगावला गेलं पाहिजे तिकडच्या मुख्यमंत्र्यांना भेटून, त्या भागातील मराठी तरुणांवर जे खटले दाखल केलेत ते काढुन घ्यायला सांगितलं पाहिजे. हिमतीने सांगा नाहीतर महाराष्ट्र आहे हे दाखवून द्या. पण ज्या महाराष्ट्राच सरकार आणि उपमुख्यमंत्री शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहतायेत आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करतायेत ते सीमाबांधवांना काय न्याय देणार, अशी सणसणीत टीकाही राऊत यांनी राज्य सरकारला केली आहे.

सीमावासीय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत नाहीत, बेळगाव केंद्रशासित करावं अशी आमची मागणी आहे. कायदेशीर लढ्यावर इतका खर्च करून वकील उपस्थित राहत नसतील तर याबाबत राज्य सरकारने विचार करायला हवा, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांना भेटावं मात्र साक्षीदार घेऊन भेटावं त्याचा रेकॉर्ड जनतेसमोर आणावा, आमचं कर्नाटकशी भांडण नाही पण हा न्यायालयाचा प्रश्न आहे हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंतप्रधान यांच्याशी बोलावं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT