Sanjay Raut News, Devendra Fadnavis News
Sanjay Raut News, Devendra Fadnavis News sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीचं मोठ मन दाखवायला हवं होतं ; राऊतांचा टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शपथ घेतली. गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला काल अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणाही साधला. राऊतांनी भाजपवरही टीका केली. (Sanjay Raut latest news)

राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही, शिवसेना फोडण्याचे प्लॅन पूर्ण झाला आहे. या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच आहे,"

"शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजपनं घेतलं आहे. शिवसेनेच्या एका गटाकडे मुख्यमंत्रीपद राहिले आहे. शिवसेनेच्या एका गटासोबत भाजप सत्तेत आले आहे. ज्या ठिकाणी ठाकरे तिथंच शिवसेना," असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

"शिंदे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात, यात आनंद आहे,आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे काम ज्यांनी केलं, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षांपूर्वी जो शब्द दिला. त्यांचे पालन आता केलंय असं आम्हाला वाटतंय. फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीचं मोठ मन दाखवायला हवं होतं, हे जर अडीच वर्षांपूर्वी झालं असतं तर आज हे झालं नसतं," असे राऊत म्हणाले.

"सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं, असं म्हणता येणार नाही, कारण मग नारायण राणे यांना का नाही मुख्यमंत्री बनवले," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे सरकार आले तेव्हा यांना आम्ही काम करू देणार नाही अशी भूमिका काहीनी घेतली होत, आम्ही अशी भूमिका घेणार नाही. महाराष्ट्राचा विकास व्हावा, असे आम्हाला वाटतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आणि फडणवीस यांचा ते उजवा हात आहेत. हा टोला नाही ते उपमुख्यमंत्री आहेत," अशा शब्दात राऊतांनी फडणवीस यांची खिल्ली उठवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT