Raj Thackeray & Sanjay Raut Latest News
Raj Thackeray & Sanjay Raut Latest News sarkarnama
मुंबई

बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, ते मागे हटणार नाही; राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंचा (Raj Thackeray) बहूचर्चीत अयोध्या (Ayodhya) दौरा हा वादात सापडला आहे. मात्र, मनसेकडून या दौऱ्यासाठी जोरात तयारी सुरू आहे. अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे 15 हजार मनसे कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शिवसेकडून (Shivsena) या दौऱ्यावर टीका करण्यात येत असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करत मनसेला पुन्हा डिवचले आहे.

राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी आधी उत्तर भारतीयांना विरोध करत मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, आता त्यांनी भूमिका का बदलली हे मला माहीत नाही. पण ते एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला निघाले आहेत, अशी टीका करत त्यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवली. आता या टीकेवर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघाव लागणार आहे. (Raj Thackeray & Sanjay Raut Latest Marathi News)

राऊतांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, बृजभूषण सिंह यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते पैलवान आहेत, तरुण कुस्तीपटूंसाठी त्यांनी काम केलेल आहे. बृजभूषण हे लढवय्या माणुस असल्याने ते मागे हटणार नाहीत, असे म्हणत राऊतांनी राज यांच्यावर निशाणा साधलाआणि भाजपलाही कोंडीत पकडले आहे.

राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी तिकडे एखादं घर घेतलं किंवा मठ,आश्रम बांधला तरी तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचे नातं काही आजचे नसून हे नाते काही राजकीय नाही. आम्ही तिकडे सतत जात असतो. राम मंदिर आंदोलनापासून आमचा अयोध्येशी संबंध आहे. ज्ञानवापी मशिदीवर सुरू झालेल्या वादावरही राऊतांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, भाजपकडून या माध्यमातून २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. दंगली पेटवून निवडणुका लढवणे दोन्ही बाजूंनी सुद्धा टाळायला हवं, असे मत राऊत यांनी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधायला ते विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT