Mumbai News: राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी मे 2023 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. तसेच त्यांचा साप म्हणूनही उल्लेख केला होता. यानंतर संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी भाजप मंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध जामीन पात्र वॉरंट काढले आहे. यापूर्वी न्यायालयाकडे राणेंनी दुसऱ्या कोर्टात या केसची सुनावणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण ही मागणी कोर्टानं फेटाळली होती.
त्यानंतर या प्रकरणी झालेल्या दोन सुनावण्यांना राणे गैरहजर राहिल्यामुळे माझगाव कोर्टानं आता नितेश राणेंविरोधात जामीन वॉरंट काढलं आहे. न्यायालयाच्या या दणक्यानंतर आता नितेश राणेंना प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घेणे बंधनकारक असणार आहे.
भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून 7 मे 2023 रोजी येत्या 10 जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावाही न्यायालयात दाखल केला होता.
संजय राऊत यांच्या याचिकेनुसार, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा सार्वजनिक दावा नितेश राणे यांनी केला होता.
यापूर्वी भाजप आमदार तथा मंत्री नितेश राणे यांना गेल्या जून महिन्यात माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा देतानाच जामीनपात्र वॉरंट रद्द करत उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी दिली होती. हा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी दिला होता. तसेच सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात 2 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेशही कुलकर्णी यांनी दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.