Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Sanjay Raut, Devendra Fadnavis Latest news  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : जेलबाहेर येताच पहिल्याच पत्रकार परिषदेत राऊतांनी केलं फडणवीसाचं कौतुक

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत सुमारे शंभर दिवसानंतर काल (बुधवारी) आर्थर रोड कारागृहाबाहेर आले. त्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं कौतुक केलं

संजय राऊत म्हणाले, "तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच हाताला घड्याळ बांधले आहे. जेलमधून सुटल्यानंतर लोक मला विसरुन जातील, असे वाटलं होते. पण कालपासून जनता माझे स्वागत करीत आहेत. जे भोगायचे होते ते मी भोगलं आहे. जेलमध्ये मला वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळत होती, तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारनं केलेली चांगली कामे वाचण्यात आली. म्हाडाकडून गरीबांना घरे देण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे," राज्याचा कारभार फडणवीस चालवित आहेत, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी लगावला. राऊत थोड्याच वेळात ठाकरे, पवार यांची भेट घेणार आहेत.

राज्यात सध्या खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे, मी लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पवारांनी मला फोन केला, त्यांनी माझ्याविषयी काळजी व्यक्त केली होती. अनेकांचे फोन येत आहेत. तरुगांत राहणं कठिण गोष्ट आहे, मी यंत्रणेला दोष देणार नाही. माझी कुणाविषयीही तक्रार नाही. माझ्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांना आनंद झाला असेल, तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे,"

“काही निर्णय राज्य सरकारने चांगले घेतले. मी त्यांचे स्वागत करतो. विरोधासाठी विरोध नाही करणार. ज्या गोष्टी राज्यासाठी आणि जनतेसाठी चांगल्या होतात. त्याचे स्वागत केले पाहिजे. अनेक निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले घेतले”, असेही राऊत यांनी म्हटले.

“तरुंगामध्ये होतो. तीन महिन्यानंतर हाताला घड्याळ लावले. तरुंगामध्ये घड्याळ घालण्यास बंदी आहे. तरुंगात राहणे चांगली गोष्ट नाही. कोणाला वाटत असेल की, लोक मजा-मस्ती राहतात, तर तसे नाही. तरुंगात खुप राहणे खूप कठीण असते. म्हणूनच तरुंगाची कल्पना तयार करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. 

राऊत म्हणाले, " महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहीजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला आहे,"

ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. नेहमीच विरोधकांवर तुटून पडणारे राऊत आजच्या पत्रकार परिषदेत मवाळ झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन दिसले. त्यांची नेहमीची आक्रमक शैली आज दिसली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT