Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News  Sarkarnama
मुंबई

मी रोज सकाळी बोललो नाही तर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात आपल्याकडे झाली ती हिटलर नीतीवरुन. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले. मात्र, आपण नैतिकता सांभाळत बसलो. तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे, असा इशारा शिवसेना खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (Bjp) दिला. आपण भाजपकडून सत्ता खेचून आणली. माझ्यासारखे हजारो लोक तयार झाले पाहिजेत. मी रोज सकाळी बोलतो, मात्र, माझा नाईलाज असतो. नाहीतर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले. शिवसैनिकांचा (Shivsena) सोशल मीडिया (social media) सेलचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये राऊत बोलत होते. (Sanjay Raut Latest News)

यावेळी राऊत म्हणाले, या देशात सुद्धा पुतीन आहेत. गेल्या अडीच तीन वर्षापासून आपण पाहत आहात. सतत आपल्या विरोधात मोठ्या प्रमामात टीका होते. बाळासाहेबांची पिढी गरम रक्ताची होती, ती जपली पाहिजे. सोशल मीडिया हा विषय माझा नाही आहे. सोशल वर्क तसे सोशल मीडिया करा. यामध्ये खूप तांत्रिक गोष्टी आहे. मला इंग्रजी येत नाही, मी मराठीत लिहितो, सामना मराठीत निघतो. मात्र, देशभरात बातमी होते. शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले. बाळासाहेब आमचे फेस होते, त्यावेळी सोशल मीडिया कुठे होती, असा सवाल त्यांनी केला.

निकाल लागला त्यावेळी कोणालाच वाटले नव्हते, आपला मुख्यमंत्री होईल म्हणून. आम्ही शिवसेना भवनात बसलो होतो. आपल्या जागा कमी आल्या त्यामुळे भाजप शब्द पाळणार नाही. मात्र, शिवसेना भवनातून बाहेर येवून मी म्हटले होते की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. त्यावेळी पत्रकार म्हणाले, शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. मी म्हटले आतापर्यंत ५६ आहेत. जेव्हा डोकी मोजली तेव्हा १७० होते, त्यामुळे आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले.

आमच्या मागे तर रोज एक संकट असते. मात्र, आमच्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाही. चेहऱ्यावर तणावर दिसला तर तो आपला पहिला पराभव असतो. करुन- करुन काय करणार तुरुंगात टाकणार किती काळ टाकणार पण जेव्हा आम्ही येवू तेव्हा अधिक डेंजर होऊन येवू. महाराष्ट्रात शिवसेना ताकदवान आहे. ज्या पद्धतीची भाषा आणि कारस्थान आमच्या बाबततीत केले जाते, त्या भाषेतच उत्तर दिले गेले पाहिजे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT