Eknath Shinde , Sanjay Raut
Eknath Shinde , Sanjay Raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मांत्रिकाला हात दाखविणाऱ्या सरकारचा अंतही अघोरी होईल ; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सिन्नर जवळ एका ज्योतिषाला हात दाखवला अशी चर्चा दोन दिवसापासून सुरु आहे, यावर विरोधकांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन शिंदेंना टोला लगावला आहे. राऊत पत्रकारांशी बोलत होते. (Sanjay Raut latest news)

"ज्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, अशी माणसं जोतिषांकडे, मात्रिकांकडे जात असतात, अघोरी विद्यांचा आधार घेत असतात. जे अशा अघोरी विद्यांचा आधार घेतात, त्यांचा अंतही अघोरी होईल, महाराष्ट्रातील जनताच त्यांचे भविष्य ठरविणार आहे," असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावेळी लगावला.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाचे कार्ड खेळून सांगली, सोलापूर, अक्कलकोट परिसरातील अनेक गावे कर्नाटकात समाविष्ट होऊ शकतात, असे सांगून सीमावाद पुन्हा उकरुन काढला आहे. यावर राऊतांनी बोम्मई यांना सुनावले आहे.

बोम्मई स्क्रिप्टप्रमाणे बोलतात..

संजय राऊत म्हणाले, "बोम्मईच्या विधानामागे मोठे षडयंत्र आहे. राज्यपालांचा विषय मागे पडावा, यासाठी अशी विधाने करण्यात येत आहेत. बोम्मई हे त्यांना दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे बोलत आहेत. पण कितीही कटकारस्थान केली तरी महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटकाला देणार नाही, आम्हाला तुरुंगाची भीती नाही,"

"आम्हीदेखील बेळगाव, कारवार, निपाणी या गावांवर दावा केला आहे. तुम्ही या गावांवरील दावा सोडणार नसाल आणि वर इतर गावांविषयी दावा करत असाल तर ते महाराष्ट्राला अजिबात मान्य होण्यासारखे नाही," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सांगितले.

"महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारले आहे. आम्ही गप्प बसायचे हे खूप झाले. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे," असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT