Sanjay Raut News : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजुंनी तणाव निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण कुणी अरे केल्यास आम्ही कारेने प्रत्युत्तर देऊ अशा शब्दांत रोखठोक भूमिका मांडली होती. या त्यांच्या विधानावरुनच ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून शेलारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. महाविकास आघाडीसह राज्यातील शिवप्रेमी संघटना राज्यापालांविरोधात आक्रमक झाल्या असून त्या कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. याच मु्द्द्यांवरुन हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून शिंदे फडणवीस सरकारला विरोधकांकडून घेरले जाण्याची शक्यता आहे. याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी राऊत म्हणाले यांनी संजय राऊत यांनी देतानाच त्यांनी आशिष शेलार यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
राऊत म्हणाले, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरला होत असून त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावे लागेल. आशिष शेलार म्हणतात, अरेला कारे करतो. मात्र, आधी त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात जाऊन त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कीटं न खाता त्यांना विचारा, कारे तुम्ही शिवरायांचा अपमान करता? आधी कारे तिथे विचारा, मग बाकीच्या गोष्टी करा. पण तुमच्या मनगटात तेवढी ताकद नाही अशी टीका देखील राऊतांनी केली
शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला हे संपूर्ण जगाला माहिती आहे.पण काल भाजपानं नवा शोध लावला आहे. त्यांनी शिवनेरीवर फुली मारली आहे. इतिहासातून शिवनेरी काढून टाकले आहे. मुळात त्यांना शिवाजी महाराज तरी मान्य आहेत का? यांच उत्तर भाजपला द्यावं लागेल असेही राऊतांनी यावेळी सांगितले.
आपल्या मंत्र्यांनी किमान सीमारेषेला स्पर्श करुन यावा....
तसेच सीमावादाच्या मुद्यावरूनही त्यांनी भाजपावर टीका केली. मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमारेषेला किमान स्पर्श तरी करून यावा, बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण यांच्यात हिंमत नाही. हे हतबल लाचार लोकं आहेत. हे काहीही करू शकत नाही. आम्हाला शिव्या घालातात, हिंमत असेल तर बोम्मईंना शिव्या घालून दाखवा, शिवरायांचा इतिहास तोडणाऱ्यांना शिव्या घालून दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.