Mumbai News: राज्यातील 2019 च्या सत्तास्थापनेचं कवित्व पाच वर्ष झाली तरी अद्याप संपलेले दिसत नाही. पहाटेच्या शपथविधीवरुन अजूनही चर्चा झडत आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत झालेल्या बैठकीला कोण उपस्थित होते, हे सांगण्यासाठी आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेल्या विधानावरुन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
सत्तेत एकत्र आणण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, या बैठकीला शरद पवार उपस्थित होते, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. त्यावर राऊतांनी फडणवीसांनी फटकारलं आहे. त्याला फडणवीस आता काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
"आमच्या पक्षातील (महाविकास आघाडी) गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस कसे करु शकतात? त्यांच्या पक्षातील गौप्सस्फोट आम्ही केले तर त्यांना आपला पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवलं होते, काय नाही हे माझ्याइतके कुणालाही माहीत नाही. त्या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे यांच्यावतीने मीच शरद पवार यांच्यासोबत होतो. सुरवातीला ज्या चर्चा झाल्या तेव्हा शरद पवार यांच्यासोबत मीच होतो. गेल्या अडीच वर्षाच देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत सत्तास्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र आणण्यासाठी बैठक झाली होती. ही बैठक अदानी यांच्या निवास्थानी झाली नाही. त्या बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. सत्तास्थापनेच्या बैठकीला शरद पवार, अमित शाह, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, असे फडणवीस म्हणाले.
११ नोव्हेंबर २०१९ मध्ये मला शरद पवारांचा फोन आला होता. अजित पवार यांना तुमच्याकडे पाठवतो, असे सांगितले होते. त्यानंतर सत्तास्थापनेची बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.