Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Thackeray Group News : मोदी आणि फडणवीसांचे राज्य पापाच्या पैशातून; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Criticize Modi and Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे...

Jui Jadhav

Thackeray Group Mumbai News :

मुंबईत शिवसेनेच्या लोकाधिकार समितीचं अधिवेशन पार पडलं. ह्या अधिवेशनात अनेकांनी भाषणं केली. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण करताना एक अजब विधान केले आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी रावणाला महान संबोधला आहे. या वक्तव्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

'रामाच्या नावावर रावण होते थोर'

लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात भाषण करत असताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामाचा प्राणप्रतिष्ठाण सोहळा पार पडला. मात्र हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असला तरीही राम राज्य आलेले नाही. रावण हा महान राजा, होता विद्वान होता. एक पुजारी देखील होता, लोक रावणाला मानतात. मात्र मोदी आणि फडणवीसांचे राज्य हे पापाच्या पैशातून निर्माण झालेले राज्य आहे. आणि त्यात भागीदारी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

'पाकिस्तानमधील पोरंही सांगतील शिवसेना कोणाची आहे'

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. भाषण करताना खासदार संजय राऊत यांनी त्यांचाही समाचार घेतला.

पाकिस्तानात जरी गेला तरी तिथलं पोरगं बोलेल की शिवसेना ही कोणाची आहे. राहुल नार्वेकर हे एकेकाळी शिवसेनेत होते आणि ते आम्हाला सांगणार की ऐऱ्या गैऱ्याची शिवसेना नाही करून. ह्या इलेक्शन कमिशनवर देखील आता विश्वास राहिलेला नाही. इलेक्शन कमिशन नव्हे तर हे मोदी शाहा यांचे कमिशन बनलेला आहे. राष्ट्रवादीच्या सुनावणीवेळी देखील स्वतः अध्यक्ष शरद पवार सुनावणीसाठी उपस्थित होते. तरी देखील त्यांच्या विरोधात निकाल लागला. उद्या इलेक्शन कमिशन उठून हे देखील म्हणेल की अजित पवार हेच शरद पवार आहेत. त्यामुळे एकंदरीत देशात अराजकता पसरायला सुरुवात झाली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन कोटी रोजगार कुठे गेले?

लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनावर देखील भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार, यांची सत्ता आल्यावर दरवर्षी दोन कोटी रोजगार युवकांसाठी निर्माण होणार होता. आतापर्यंत 20 कोटी रोजगार युवकांसाठी निर्माण व्हायला हवे होते. परंतु ते झालेले नाहीत. दुसरीकडे आमच्या लोकाधिकार समितीने पन्नास वर्षे पूर्ण केले आहेत आणि या 50 वर्षांत लाखो युवकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे,

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT