Sanjay Raut | Devendra Fadanvis
Sanjay Raut | Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News: मला तुरुंगात टाकण्याचा डाव; फडणवीसांचे आरोप संजय राऊतांनी धुडकावले, म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut Replied Devendra Fadanvis's Alligations : आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एबीपी माझा ने आयोजित केलेल्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात त्यांनी याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे.

''माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अटक करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांना देण्यात आले होते. पण मी कोणतंही काम तसं न केल्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही.'' असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. पण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे हे आरोप धुडकावून लावत फडणवीसांवरच गंभीर आरोप केले आहेत.

“यामध्ये कोणतेही तथ्य नाही, हे खोटं आहे. त्यावेळी फडणवीस हे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री होते. राजकीय विरोधकांना फसवून तुरुंगात पाठवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण गेल्या सात वर्षांपासू ही परंपरा सुरु झाली असून आम्ही त्याचे बळी आहोत” असंही राऊत यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासारखा सुसंस्कृत मुख्यमंत्री असताना अशा घटना घडण हे अजिबात शक्य नव्हतं. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे हा गुन्हा आहे. त्यासंदर्भात होत असलेली पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होत असेल तर ती होऊ द्यायला हवी होती. पुरावे समोर आहे. पण हे प्रकरण माझ्यापर्यंत येईल म्हणून तुम्ही का त्रास होतोय, तुम्ही अस्वस्थ नसता तर तुमचं सरकार आल्यावर तुम्ही ती पोलीस अधिकाऱ्याची चौकशी थांबवली नसती. पण तुमचं सरकार आलं आणि तुम्ही आदेश काढून त्या चौकशा थांबवल्या.” अशा स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजप म्हणते ईडी आणि सीबीआय केस असेल तर अटक करते मग तुम्ही म्हणता ईडी आणि सीबीआय खोट्या केसेस दाखल करत आहे. '' हो खोट्याच केसेस आहेत. तुम्ही अनिल देशमुख यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणतेय ते पहा. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा न्यायालयावर विश्वास नाही का, की सध्याचे न्यायमंत्री जे म्हणतायेत त्यांना न्यायालयावर ताबा पाहिजे, तो ताबा ह्यांनी आधीच घेतलेला आहे. मला खोट्या प्रकरणात अटक केली. मघाशी त्यांनी गौप्यस्फोट केला ना आता मीही गौप्यस्फोट करतोय.

हे सरकार बनत असताना कोण अडथळे ठरु शकते, याची लिस्ट काढली गेली. यात पहिल्या क्रमांकावर संजय राऊतांचे नाव होतं. चार लोकदिल्लीत गेले आज ते सरकारमध्ये आहेत. यांचा बंदोबस्त करा, असं सांगण्यात आल. त्यानंतर संजय राऊत को अंदर डालो, दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर रेड पडली आणि त्याच दिवशी मला अटक झाली. असे अनेक गौप्यस्फोट आम्ही करु शकतो. पण आम्ही शांत आहोत. कधीतरी आमचेही दिवस येतील आणि आले तरी आम्ही असं करणार नाही.

ते चार लोक कोण असा सवाल विचारला असता राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मला अटक होऊच शकत नाही. जो व्यकी गेल्या २० वर्षांपासून खासदार आहे. जो देशाच्या स्टॅंडिंग कमिटीवर आहे, जो शिवसेनेचा नेता आहे. त्याला अटक करण्यासाठी एक आदेश लागतोच ना. ईडीचे डायरेक्टर असं करुच शकत नाहीत, त्यांना वरुन आदेश आला आणि मला अटक झाली. त्यांना हे सरकार बनवायचं होतं म्हणून त्यांनी मला अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT